Thursday, March 27, 2014

राहिले रे दूर घर माझे

चूक माझी नव्हती
ती रात्रच बेकार होती
मी एकटी होती म्हणून
काहींच्या हवस्ची शिकार होते.



चूक खरच माझी नव्हती

ती त्यांची वासना होती
स्वतःसाठी पळत होते
पण अखेर झालेच बळी



चूक माझी नव्हती

पण त्या रात्रीनंतर
आयुष्यात माझा कायमचीच रात्र आरंभली होती
भर रस्त्यात मी एकटी पडली होती



चूक खरच  माझी नव्हती

पण आजन्म पुरून उरतील
अशा अश्रूंची त्या गुंडांनी
माझ्या पदरात भर टाकली होती



चूक माझी नव्हती

पण आई बाबांनी  साथ सोडली
लग्न ज्याचाशी होणार होते
त्यानेही पाठ दाखवली



चूक माझी नसताना पण

राहिले दूर घर माझे
हाक मारूनही आले नाही कोणी
तुटले सारे नाते



चूक त्या जनावरांची होती

कि त्यांनी माला जिवंत टाकले
अंगावर कापडाचा तुकडा उरला नाही
पण शरीर झाकण्या इतके जखमा दिले



माझी चूक नसताना

मी जन्मतः  शिक्षा भोगणार
स्वतःशी  नझर चोरत चोरत
असह किती काल जगणार?



नाहीच आहे ती माझी चूक

पण मी सांगून सांगून थकले
बळी झारी गेला आहे माझां
अजूनही मी निष्पाप आहे



चूक माझी नव्हती

ती रात्रच बेकार होती
मी एकटी होती म्हणून
काहींच्या हवस्ची शिकार होती .

No comments:

Post a Comment